त्याचबरोबर भारताला पहिले सुवर्णपद जिंकून देणारे श्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जून जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मुरलीकांत पेटकर यांचा प्रवास खूप प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपद जिंकले होते. ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण शर्यत ३७.३३ सेकंदात पूर्ण करून त्यांनी विश्वविक्रम केला होता. याआधी त्यांना पद्मश्रीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक पदकविजेत्या स्वप्निल कुसाळेच्या प्रशिक्षिका दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दिपाली यांनी २००४ च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये या क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचबरोबर त्यांनी २००२ साली आशियन गेम्समध्ये १० मीटर एअर रायफल क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार :
ज्योती येराजी (ऍथलेटिक्स), अन्नू राणी (ऍथलेटिक्स), नितू (बॉक्सिंग), सविती (बॉक्सिंग), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जर्मनप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत सिंह (हॉकी), राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी), प्रीती पाल (पॅरा-ॲथलेटिक्स), जीवनजी दीप्ती (पॅरा-ॲथलेटिक्स), अजित सिंह (पॅरा-ॲथलेटिक्स), सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा-ॲथलेटिक्स), धरमबीर (पॅरा-ॲथलेटिक्स), प्रणव सूरमा (पॅरा-ॲथलेटिक्स), एच होकातो सेमा (पॅरा-ॲथलेटिक्स), सिमरन (पॅरा-ॲथलेटिक्स), नवदीप (पॅरा-ॲथलेटिक्स), नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन), सुश्री तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा-बॅडमिंटन), नित्या श्री सुमथी सिवन (पॅरा-बॅडमिंटन), मनिषा रामदास (पॅरा-बॅडमिंटन), कपिल परमार (पॅरा-जुडो), मोना अग्रवाल (पॅरा-शूटिंग), सुश्री रुबिना फ्रान्सिस (पॅरा-शूटिंग), स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग), सरबज्योत सिंह (शूटिंग), अभय सिंह (स्क्वॅश), साजन प्रकाश (स्विमिंग), अमन (कुस्ती),